Pages

Thursday, February 27, 2014

ज्योतिषीय व वास्तुशास्त्रीय उपाय


                                   ज्योतिषीय व वास्तुशास्त्रीय उपाय
१. घरातील देवघर हे नेहमी ईशान्य ( पुर्व आणि उत्तर मधील दिशा ) दिशेलाच असावे व नित्य पुजा केल्याने घराची सर्वांगीण प्रगती होते.
२.आपल्याला ज्यांच्यामुळे अन्न, वस्त्र, निवारा आणि हे आयुष्य मिळाले आहे त्यांचे दररोज आभार मानावेत. ( आई वडील, कुलदेवता व देव देवता, असंख्य व्यक्ती ज्यांचा तुमच्या आयुष्याशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संबंध येतो )
३. आई वडिलांचा नेहमी आदर सन्मान करा, नशीब निश्चित साथ देते, वृध्द आई वडील श्री लक्ष्मी विष्णु प्रमाणे असतात.
४. रोख रक्कम हातात पडली की ती घरी आणून देवापुढे ठेवावी. कुठल्याही परिस्थितीत त्यातील एक रुपयाही खर्च करु नये दुसऱ्या दिवसापासुन खर्च करायला सुरुवात करावी.
५. व्यापाऱ्यांनी वापरावयाच्या पैशांचा पाऊच किंवा पिशवी शक्यतो हिरव्या रंगाची वापरावी
६. बुधवारी पैसे कोणास उधार देऊ नयेत. दिल्यास ते बुडतात व वसुलीला त्रास होतो. गुरुवारी पैसे देणे चांगलेमंगळवारी कर्जाचे पैसे देऊन कर्जफेड करावी. वा शुक्रवारी कर्जफेड स्थितीत सुधारणा होते. मंगळवारी पैसे/कर्ज घेतल्यास ते लवकर फिटत नाहीत.
७. संध्याकाळनंतर दिवे लागल्यावर कोणाला पैसे देऊ नये. तसेच दैनंदिन राहु काळात पैसे देणे/घेणे व्यवहार करू नये.
८. दिवा वा समईच्या ज्योतीचे तोंड उत्त्तरेकडे असल्यास लक्ष्मी प्रसन्न होते. पुर्वेकडे असल्यास सुखप्राती होते.
९. आपल्या कपाळी मधल्या बोटाने गंध लावुनच नंतर देवपुजा करावी. म्हणजे ती पुजा पुर्ण होते.
१०. कोणत्याही कामासाठी बाहेर निघताना नेहमी पुर्णांगाचा (ज्या नाकपुडीतुन श्वास सुरु आहे ती बाजु) पाय घराबाहेर टाकुन निघावे म्हणजे यश मिळते.
११. घरात मनीप्लँट लावु नये. पैशाची चणचण भासते.
१२. श्री स्वामी समर्थ ’ किंवा “ ॐ श्रीं नमः ” हा जप सतत धनलाभ होतो.
१३. लक्ष्मीप्राप्तीचा सोपा आणि अनुभवसिध्द उपाय म्हणजे पिठात थोडी साखर मिसळुन ते पीठ मुंग्यांना खाऊ घालावे.
१४.घरातुन कामानिमित्त्त बाहेर पडताना शर्टाच्या खिशात थोडेतरी पैसे ठेवावेतच. मोकळ्या खिशाने कधीही घराबाहेर पडु नये. पैसा पैशाकडेच जातो हे सत्य आहे.
१५. घराच्या व दुकानाच्या दरवाजाला पायांनी स्पर्श करू नये.
१६. रोज सकाळी पुजा झाल्यावर घरात शंख न विसरता फुंकावा. घरात वास्तव्यास असलेली अलक्ष्मी (लक्ष्मीची मोठी बहीण अवदसा) काढता पाय घेईल आणि लक्ष्मी चिरंतर नांदेल.
१७. द्रव्यप्राप्तीसाठी काही प्रभावी मंत्राचा विनियोगही सांगितला आहे. द्रव्यप्राप्ती करून देणारा सर्वात प्रभावी मंत्र म्हणजे “ॐ नमो विष्णवे नम:” जेथे भगवान विष्णु तेथे माता श्री लक्ष्मी असणारच. ( उत्तरेकडे तोंड करून बोलल्यास उत्तमच )
 १८. जो मळकट कपडे घालतो. दात स्वच्छ घासत नाहीजास्त जेवतोकठोर बोलतो आणि सुर्योदयी अथवा सुर्यास्ता समयी झोपतो तो साक्षात श्री विष्णुदेव असला तरी माता श्री लक्ष्मी त्याला सोडुन निघुन जाते.
१९. जी व्यक्ती दररोज  सुर्याची बारा नावे घेवुन सुर्याला नमस्कार करते त्याला आयुष्यआरोग्यऎश्वर्य व तेजाची प्राप्ति होते.  ( १) ॐ सुर्याय नम: २) ॐ भास्कराय नम: ३) ॐ रवये नम : ४) ॐ मित्राय नम: ५) ॐ खगाय नम: ६) ॐ भानवे नम: ७) ॐ पुष्णे नम: ८) ॐ मरीचये नम: ९) ॐ आदित्याय नम: १०) ॐ सवित्रे नम: ११) ॐ अर्काय नम: १२) ॐ हिरण्यगर्भाय नम: )
२०. कोणाकडे आपले महत्वाचे काम असल्यास खिशातुन पाच लवंगा किंवा लसणीच्या सोललेल्या पाकळ्या एका पुडीत बांधुन घेऊन जाव्यात. यामुळे महत्वाच्या कामातील अडथळे नष्ट होऊन आपले काम होते. चांगला लाभ होतो.
२१. दर गुरुवारी तुळशीला थोडे कच्चे दुध घातल्याने घरात लक्ष्मीचे कायमस्वरूपी वास्तव्य राह्ते.
२२. “ ॐ यक्षाय कुबेराय वैश्रवणायधनधान्यधिपतये धनधान्य समृद्धी मे देही दापय स्वाहा ” उत्तर दिशेला कुबेराचा फोटो लावावा. हा कुबेराचा अत्यंत प्रभावी मंत्र आहे. या मंत्राचा १०८ वेळा कमळगट्टेच्या माळेवर जप करावा. श्री कुबेरांचा नित्य जप हा श्री लक्ष्मी प्रमाणे अतिशय महत्वाचा आहे
२३. कामानिमित्त घरातुन बाहेर पडताना एखादे तुळशीपत्र तोंडात टाकावे, पैशाअभावी अडकलेली कामे मार्गी लागतील.
२४. घरातील फरशी पुसताना थोडे खडे मिठ पाण्यात टाकावे. त्यायोगे घरातील नाकारात्मक ऊर्जा नष्ट होईल. लक्ष्मीप्राप्तीतले सर्व अडथळे दुर होतील.
२५. ज्या ज्या वेळी आपण समुद्रकिनारी फिरायला जाता त्या त्या वेळी जलदेवतेला प्रार्थना करून एक श्रीफळ ( नारळ ) कुंकू अर्पण करुन विसर्जित करा. बऱ्याच गोष्टी सत्मार्गी लागतात.
२६. दर शनिवारी संध्याकाळी मातीच्या दिव्यात सरसोच्या तेलाचा दिवा लावुन आणि गुळ मिश्रित पाणी सुर्यास्तानंतर पिंपळाला सात प्रदिक्षणा घालुन “ ॐ श्री अश्वत्थाय शरणं मम ” म्हणत अर्पण करावे व नंतर श्री शनिदेवांचा “ नीलांजन समाभासं रविपुत्रं यमाग्रजम, छाया मार्तंड संभुतं तं नमामि शनैश्वरम ” हा मंत्र ८ वेळा म्हणावा, हा श्री शनि पीडा कमी होण्याचा प्रभावी मंत्र आहे. 
२७. घरामध्ये सुर्यास्ताच्या अगोदर झाडु मारावा. सुर्यास्ताच्या झाडु मारल्यास माता श्री लक्ष्मी हि रुष्ठ होऊन घरातुन निघुन जाते व त्यामुळे घरामध्ये अलक्ष्मीचा वास राहतो.
२८.जो कोणी दररोज तुळस, पिंपळ आणि नक्षत्र आराध्य वृक्षाला पाणी घालतो त्याला सर्व गोष्टीत भरपुर यशाचा वरदहस्त प्राप्त होतो.
२९. कुलदैवताचे वर्षातुन एकदा दर्शन,अभिषेक व पुजा टाळाटाळ न करता करावी. तुमच्याकडे पैशाचा ओघ आणि यश सतत वाहत राहील.
३०. गुरूपुष्यामृत योगावर सराफाकडून किमान १ मिलीग्रॅम तरी सोने न विसरता प्रसंगी पोटाला चिमटे घेऊन विकत आणावे. पुरेसे सोने जमा झाले की पत्‍नीलाच एखादा दागिना करावा. सोने गुरुपुष्यामृत योगावर खरेदी करण्याचे कारण असे की ते विकायची पाळी कधीच येणार नाही.
३१. श्री विष्णु देवता, माता श्री लक्ष्मी, श्री कुबेरजी यांची साधनापुजाप्रार्थना करताना साधकाचे तोंड उत्तरेकडे असावे अथवा पुर्वेकडे.  
३२. कोणत्याही महत्त्वाच्या कामासाठी घराबाहेर पडताना चमचाभर गोड दही खाणे अत्यंत शुभ असते.
३३. स्नान करूनच भोजन करावे. जेवण केलेल्या ताटात हात धुऊ नये. मांडीवर वा हातात ताट घेऊन जेवु नये. दक्षिणेकडे तोंड करून जेवु नये.
३४. एक लांबलचक मोरपीस विकत आणुन ते घराच्या दक्षिणेकडील भिंतीवर सेलो टेपने चिकटवुन ठेवावे रोज सायंकाळी त्याला उदबत्ती ओवाळावी. हा तोडगा ज्यांचे येणे अडकुन पडले आहे त्यांनी अवश्य करून पाहण्यासारखा आहे.
३५. व्यापार मंदावत चालला असेलव्यापार बंद पडला असेल किंवा भांडवल असुनही व्यापार होत नसेल तर अशा वेळी व्यापारामध्ये यश येण्यासाठी पुढील प्रभावी तोडगा अवश्य करावा. दररोज सकाळी देवासमोर बसुन विष्णुसहस्त्रनामाचा जप करावा. ‘ॐ नमो विष्णवे नम:’ या मंत्राचा १०८ वेळा जप करावा. या तोडग्यामुळे लक्ष्मी प्रसन्न होऊन व्यापारामध्ये यश येते.
३६. रोज गरम तव्यावर पोळी-भाकरी भाजण्यापुर्वी दुध शिंपडावे यामुळे घरातील आजारपण कमी होते.
३७. जास्तीत जास्त अन्नदानाच्या योगे अनेक दोष नष्ट होतात.
३८. जेव्हा बँकेत पैसे जमा करण्यासाठी जात असाल तेव्हा रस्त्याने मनातल्या मनात “श्रीं श्रीं” मंत्राचा जप अवश्य करत जावा. यामुळे आर्थिक स्थितीमध्ये आश्र्चर्यकारक रूपात वृद्धी होईल. वारंवार धन जमा करण्याची संधी येईल व शक्यतो उत्तरेकडे तोंड करून बँकेचे व्यवहार करावेत.
३९. लक्ष्मीप्राप्तीसाठी अन्न व दुध झाकुन ठेवावे.
४०. घरातील नवीन केरसुणी आणल्यावर तिला हळद/कुंकू लावुन पुजा करून वापरावी. तिला पाय लावु नये व ती सहज दिसेल अशी ठेवु नये. दिवे लागल्यावर झाडु मारू नये.
४१. घराचा मुख्य दरवाजा नेहमी फडक्याने पुसुन स्वच्छ ठेवावा तसेच संध्याकाळी तिन्हीसांजेला मुख्य दरवाजा थोडा वेळ उघडा ठेवावा. त्या वेळेस धुप दाखवावा. लक्ष्मी प्रसन्न राहते.
४२. दसऱ्याच्या दिवशी एखाद्या गर्भश्रीमंत व चरित्र्यवान व्यक्तीने दिलेली आपट्याची पाने चांदीच्या अगर पितळेच्या डबीत ठेवुन ती देवापाशी ठेवावी. अशा तऱ्हेने मिळालेली आपटयाची पाने ही धन देणारी असतात.
४३. घरात ज्या खोलीत तिजोरी ठेवलेली असेल त्या भिंतीचा रंग काळालाल अथवा निळा नको. पिवळा असावा.
४४. रोज सकाळी पाण्यात थोडेसे खडे मीठ मिसळुन त्या पाण्याने घरातील फरशी पुसावी. मन:शांती लाभते .
४५. रोज सकाळी पहिली भाकरी गायीलादुसरी कुत्र्याला व तिसरी छतावर पक्ष्यांसाठी ठेवावी. यामुळे पितृदोष नाहीसा होतो व पितृदोषाने होणारा त्रासही कमी होतो.
४६. कोणाकडुन कर्ज घेतले तरत्यातला पहिला हफ्ता त्वरित कर्जफेड म्हणुन परत करावेत. कर्ज लवकर उतरते.
४७. माता श्रीलक्ष्मी साधना:- पौर्णिमेच्या रात्री आंघोळ करून रात्री १२-१८ वाजता चंद्राकडे पाहुन गायत्री मंत्र १२ वेळा म्हणून कोणाशीही न बोलता झोपी जावे. जर बोलण्याचा प्रसंग आला तर बोलल्यानंतर पुन्हा हातपाय धुऊन पुन्हा चंद्रबिंबाकडे पाहून गायत्री मंत्र १२ वेळा जपावा. गायत्री मंत्र: “ ॐ भुर्भव:स्व: तत्स वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धिमही धियोयोन: प्रचोदयात ” हा अतिशय प्रभावी उपाय आहे.
४८. सकाळी उठल्यावर अंथरुणातच करदर्शन ( दोन्ही हातांच्या तळव्याकडे बघुन )
 “ कराग्रे वसती लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमुले तु गोविंद प्रभाते करदर्शनम व नंतर भुमीला हात लावुन  “ समुद्रवसने देवी पर्वतस्तनमंडीते विष्णुपत्नि नमस्तुभ्यं पादस्पर्श क्षमस्वमे म्हणुन भुमिवंदन करावे.
४९. घराच्या प्रवेशद्वारावर/ मुख्य दरवाजावर लाल रंगाचे कुंकवाचे स्वस्तिक व शुभ लाभ चिन्ह काढावे. या स्वस्तिक व शुभ लाभची स्टिकर्स शक्यतो लावु नये.
५०. उंबरठयावर दर पोर्णिमेला तसेच अमावस्येला पाच कापराच्या वडया ( पंचमहाभुतांच्या दोष परिहारार्थ ) जाळाव्यात.
५१. तुटलेले अथवा भेगा गेलेले कपस्टीलचीकाचेची अथवा प्लॅस्टिकची भांडीबंद पडलेली घडयाळे किंवा भंगारवजा सामान घरात ठेवु नये. अशा वस्तु ताबडतोब घराबाहेर काढाव्यात कारण या तुटलेल्या व भंगारवजा वस्तुंमध्ये कलीचा वास असतो. अलक्ष्मीला आमंत्रण असते.
५२. एकाक्ष नारळाला विशेष महत्व का असते ?
    उत्तर:  बहुतेक सर्व नारळाला तीन डोळे असतात. क्वचितच एक डोळा असलेला नारळ असु शकतो. एकाक्ष नारळ लक्ष्मीदायक असल्याने सांपत्तिक लाभ होतो. म्हणुन अशा एकाक्ष नारळाला ‘चिंतामणी’ नारळ म्हणतात. असा नारळ फोडत नाहीत त्यास देवघरात किंवा वरती टांगुन व्यवस्थित ठेवावा.
५३. श्री विष्णुश्री सुर्य आणि श्री शिव यांच्या मंदिरासमोर कधीही घर बांधु नये.
५४. मंगळवार व रविवार हे दोन वार घर बांधण्याचा प्रारंभ करण्याच्या दृष्टिकोनातुन व वास्तुशांती साठी पुर्णत: वर्ज्य करावेत.
५५. घराच्या मुख्य दरवाजापेक्षा घराचे आतील दरवाजे हे कधीही उंच अथवा मोठे असु नयेत. घराच्या मुख्य दरवाज्याची चौकट नेहमी लाकडाचीच असावी.
५६. आपण नवीन आणि जुने लाकुड एकत्र करून कपात, फर्निचर, दरवाजा बनविला तर ते घरासाठी कलहकारक आणि अधोगतीकारक ठरतात.
५७. कोणत्याही आजारी माणसाने अथवा आजारी माणसास उत्तरेस तोंड करुन बसवुन औषध दिल्यास त्याचा आजार कमी होतो
५८. काटेरी रोपटी अथवा कॅक्ट्स घरात लावल्यामुळे त्या घरात राहणाऱ्या व्यक्तींना कसल्यातरी प्रकारची उद्विग्नता येत असते अथवा बारीक सारीक कारणावरून कुटुंबीयांमध्ये वादंग निर्माण होत असतात आणि म्हणुन अशा प्रकारचे काटेरी वृक्ष घरामध्ये लावणे प्रत्येकाने जरूर टाळावे.
५९. घडयाळ कोणत्या भिंतीवर लावणे योग्य ?
   उत्तर: घडयाळ ही एक जिवंतपणा दाखविणारी वस्तु मानत असल्याने पुर्व किंवा उत्तर भिंतीवर ते लावावे. बंद घडयाळे त्वरित दुरूस्त करावीत किंवा बदलावीत.
६०. बाधित वास्तुसाठी काय उपाय करता येतात?
   उत्तर: घरात सतत “ श्री स्वामी समर्थ ” चा जप चालु ठेवावा. श्री सप्तशतीची आवश्यकतेनुसार हवनात्मक नवचंडी किंवा शतचंडी करावी.
६१. एका मोठया संगमरवरी कुंडात उत्तरेस कमळाचे रोप लावावे. त्यामुळे व्यावसायिक ध्येयाप्रत तुमची त्या कमलासमान फुलुन वाटचाल होईल.
६२. दरवाजाच्या डोक्यावर खोबणीत मंगल कलश ठेवल्यास उत्तम आणि ते शक्य नसेल तर बाजारात मंगल कलशाची टाइल मिळते ती बसवावी.
६३. ज्या व्यक्तींच्या घरात बेलाचे रोपटे/झाड असते त्या घरात लक्ष्मीचा वास असतो.
६४. आपल्या घरच्या प्रवेशद्वारासमोर कोणतेही झाड असु नये हे शतश: खरे आहे. त्यामुळे द्वारवेध हा दोष निर्माण होतो. तसेच मुख्य प्रवेशद्वारावर कोणत्याही झाडाची सावली (सोने देणारे झाड असले तरी त्याची सावली प्रवेशद्वारावर असु नये) किंवा मंदिराच्या कळसाची सावली पडु नये नाहीतर नाश होऊ शकतो.
६५. घरमालकीण गरोदर असताना बांधकाम सुरू करू नये.
६६. ज्यांचा विवाह होण्यास अनेक अडचणी येतातठरलेले विवाह मोडतात अशांनी ‘नवनाथ भक्तिसार’ २८ वा अध्याय दररोज संध्याकाळी सातनंतर वाचावा.
 ६७. नोकरीधंद्यासाठी किंवा कोणत्याही कामासाठी घरातुन बाहेर पडण्यापुर्वी खालील मंत्र मनातल्या मनात ८ वेळा म्हणुन मगच घराचा उंबरा ओलांडावा
  ॐ कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेश नाशाय गोविंदाय नमो नम: 
६८. दररोज किंवा कोणतेही मुख्य किंवा महत्वाचे काम करताना कुलदेवताचे स्मरण जरूर करावे.
६९. पैसे मोजताना पैशाला कधीही थुंकी लावुन पैसे मोजु नयेत, पैसे मोजताना श्री विष्णु, श्री बालाजी, श्री लक्ष्मी आणि श्री कुबेरांचे स्मरण जरूर करावे.
७०. नोकरीच्या मुलाखतीस जाताना थोडा गुळ रस्त्यावरील गायीस खायला द्यावा.
९९. मुले नीट वागण्यासाठी नवनाथ भक्तिसारातील ५ वा अध्याय घरात दररोज संध्याकाळी ७ नंतर वाचावा.
१००. आपल्या घरामध्ये आपली पत्नीमुले किंवा कोणालाही अपशब्द वापरू नयेत. कारण वास्तु नेहमी तथास्तु म्हणत असते.
१०१. घरात रोज अग्निहोत्र चालत असेल तर उत्तम असते. अन्यथा निदान आठवडयातुन किंवा महिन्यातुन एकदा तरी करावे.
१०२. वर्षातुन एकदा तरी घरात उदकशांती किंवा पुजा श्रावणात करावी.
१०३. घरात नंदादीप सतत तेवत ठेवल्याने अशुभ ऊर्जा घरात राहत नाहीत, ज्या घरात अग्नि तेवत असतो तिकडे माता श्री लक्ष्मीचा वास असतो.
१०४. रोज सकाळ-संध्याकाळ आपणास आवडत्या अशा मंद सुवासाची उदबत्ती किंवा धुप घरात जाळावे.
१०५. लहान मुलांकडुन काही नित्य स्तोत्र रोज म्हणुन घ्यावीत व आपणही म्हणावीत, घरातील वातावरणात शुद्धी होते.
१०६. घरात कोणत्याही प्रकारची अडगळ ठेवु नका. शक्य तेवढी लवकर त्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावत जा. अडगळ म्हणजे अलक्ष्मी.
१०७. आपल्या स्वत:च्या गाडीचे पार्किंग उत्तरेस किंवा पुर्वेस तोंड करुन ठेवावे. दक्षिणेला तोंड करुन गाडी ठेवु नये.
१०८. शिकार केलेल्या प्राण्यांचे मुखवटे किंवा जंगली ओबडधोबड लाकडाचे सिरॅमिक्स किंवा मनाला विचलित करणाऱ्या गोष्टी घरात ठेवु नयेत.
१०९. बेडरुमला रंग लावताना पिस्ता किंवा गुलाबी रंगाचा वापर करावा. कारण हे रंग प्रेमाचे आणि समाधानाचे प्रतीक मानले जातात.
११०. दर बुधवारी तिजोरीची पुजा करावी. तिजोरीवर काही जड वस्तु किंवा देव वगैरे ठेवु नयेत.
१११. तुळशीत काही लोक शंकराची पिंड ठेवतात. ते चुकीचे आहे. तर काही लोक भंगलेल्या मुर्ती तुळशीत ठेवतात तेही चुकीचे आहे. तुळशीत फक्त देवास वापरलेले पाणी विसर्जित करावे. ( पिंडीस वाहिलेले पाणी सोडुन )
११२. घरात विनाकारण कटकट होत असेल तर घरामध्ये हळद आणि गोमुत्र मिश्रित पाणी शिंपडावे. तरीही फरक न वाटल्यास पाच सवाष्णींना मानपान करावे व दुध द्यावे, असे केल्याने कटकटी कमी होतील.
११३. दिवसभरांत सतत जास्तीत जास्त वेळा हरि ”  “हरि  म्हणत राहिल्यास बी. पी कमी होतो. हरि  म्हणताना ते ऎकण्याचा प्रयत्न करावा. जास्त फायदा होतो.
११४. श्रीवेद व्याससुध्दा म्हणतात ज्याचे मन किंवा विचार मोठे त्याचे भाग्यही मोठे असा मानसशास्त्राचा प्रत्यक्षानुक्षणी सिद्धान्त आहे म्हणुन नेहमी सकारात्मक विचार करावेत.
११५. अभ्यास खोलीत टेबलासमोर गणपतीसरस्वती किंवा इष्ट देवतेंची चित्रे ठेवावी.
११६. झोप येत नाही हा मंत्र बोला (२१ वेळा)                                                                                        “ या देवी सर्वभूतेषु निद्रारुपेण संस्थिता । नमस्तस्ये नमस्तस्ये नमस्तस्ये नमो नम: ”
११७. दरवाजे जिर्ण झाल्यास त्वरीत बदलणेएखाद्या दरवाजा जिर्ण होऊन कीड लागल्यास त्यामुळे दिशानुरूप घरातील व्यक्तीवर पुर्व ईशान्य पुरुषउत्तर ईशान्य स्त्रीदक्षिण नैॠत्य स्त्रीपश्चिम नैॠत्य पुरुषपश्चिम वायव्य स्त्रीपुर्व आग्नेय स्त्री अशा प्रकारे त्यांचे आरोग्य बिघडविण्यास कारणीभुत ठरतात
११८. ज्या वनस्पतीमधून पांढरा चिक येतो अशी झाडे घराभोवती लावु नये.
११९. “श्रीयंत्र” घरात स्थापण करून ‘श्रीसुक्त’ चा किमान एक पाठ रोज करावा.
१२०. वास्तुमध्ये किंवा पुजेमध्ये कोणत्याही प्रकारची अंत्यविधीची रक्षा ठेवु नये.
१२१. देवघरातदेवाच्या फोटोबरोबर मृत व्यक्तीचे फोटो ठेवु नये.
१२२. “ कराग्रे वसते लक्ष्मी: करमध्ये सरस्वती । करमुले तु गोविन्द: प्रभाते करदर्शनम ”
अर्थ : हाताच्या टोकावर (बोटांवर) लक्ष्मी असतेहाताच्या मुळाशी (मनगटालगत) सरस्वती असतेतळहाताच्या मध्यावर श्रीगोविन्द असतो. म्हणुन सकाळी तळव्यांचे दर्शन घ्यावे.
१२३. मुख्य दरवाज्यास लाकडाचा उंबरठा असणे आवश्यक असते.
१२४. एक स्वच्छ मोठी बाटली घेऊन त्या बाटलीत शुध्द पाणी भरावे. त्यात गोमुत्रकापुरहिंग पावडरवावडिंग पावडर सर्व मिळुन मोठे दोन चमचे टाकावेत. हे बाटलीतील पाणी संडास-बाथरूम सोडुन सर्व घरात सकाळ-संध्याकाळ शिंपडावे हा प्रयोग ४५ दिवस करावा.
१२५. ज्या नवीन वास्तुस दारेखिडक्या बसविलेल्या नाहीत अशा वास्तु मध्ये ब्राह्मणभोजन झाल्याशिवाय कधीही प्रवेश करू नये. कारण अशामुळे निरनिराळ्या आपत्तींना तोंड देण्याचा प्रसंग उद्‍भवतो. यमघंट योगावर गृहप्रवेश कधीही करू नये.
१२६. वास्तुमध्ये महारुद्रलघुरुद्र पुजन करावे.
१२७ उंबरठयावर लक्ष्मीची पावलं चिकटवु नयेत. कारण त्या माता श्री लक्ष्मीच्या पावलांवर आपली पावले पडणं हे काही बरं नाही.
१२८. आपल्या नावाची पाटी सेप्टी डोअर किंवा भिंतीवर न लावता मुख्य दरवाजावरच लावावी.
१२९. आपल्या नवीन घराला जुना दरवाजा बसवु नये (सेकंड हॅंड) असा दरवाजा आपण बसविला तर तो जुन्या स्वामीची इच्छा करतो. आणि सर्वच वास्तुरचनाकारांनी अशा दरवाजाला जोरदार विरोध केलला आहे.
१३०. रोज सकाळी उंबरठा स्वच्छ करावा. त्याची हळद कुंकू वाहुन पुजा करावी.



Thursday, February 13, 2014

nakshtra

अश्विनी
   नक्षत्र
 अश्विनी
नक्षत्र देवता
 अश्विनीकुमार
नक्षत्र स्वामी
 केतु
नक्षत्र आराध्य वृक्ष
 कुचला
नक्षत्र पर्यायी वृक्ष
 अडुळसा
राशी व्याप्ती  
४ हि चरण मेष राशीमध्ये
नक्षत्र प्राणी
   घोडा
नक्षत्र तत्व
  वायु
नक्षत्र स्वभाव
  शुभ

पौराणिक मंत्र
अश्विनी देवते श्वेतवर्णो तौ व्दिभुजौ स्तुमः l
सुधासंपुर्ण कलश कराब्जावश्च वाहनौ ll     

नक्षत्र देवता नाममंत्र
१)  ॐ अश्विनीकुमाराभ्यां नमः
२)  ॐ अश्विभ्यां नमः    

नक्षत्र पीडाहर मंत्र
स्वर्वेद्यावश्वीनौ देवौ व्दिभुजौ शुक्लवर्णको l
सर्वारिष्ट विनाशाय अश्विभ्यांवै नमो नमः         
नक्षत्र नाम मंत्र
 ॐ अश्वयुगभ्यां नमःl  
                                       भरणी
    नक्षत्र
 भरणी
नक्षत्र देवता
 यम - आद्य पितर   
नक्षत्र स्वामी
 शुक्र  
नक्षत्र आराध्य वृक्ष
 आवळा  
नक्षत्र पर्यायी वृक्ष
 खैर 
राशी व्याप्ती  
४ हि चरण मेष राशीमध्ये
नक्षत्र प्राणी
   हत्ती  
नक्षत्र तत्व
  अग्नी  
नक्षत्र स्वभाव
  क्रूर  

पौराणिक मंत्र
पाशदण्डं भुजव्दयं यमं महिष वाहनम l
यमं नीलं भजे भीमं सुवर्ण प्रतीमागतम् ll         
नक्षत्र देवता नाममंत्र
ॐ यमाय् नमः l    
नक्षत्र पीडाहर मंत्र
दंडहस्तघरं देवं महामहिष वाहनं l
सर्वारिष्टं विनाशय नैमिनित्यं ll          
नक्षत्र नाम मंत्र
ॐ अपभरणीभ्यो नमःl 
                         कृतिका   
               नक्षत्र
 कृतिका
नक्षत्र देवता
 अग्नी
नक्षत्र स्वामी
 रवि  
नक्षत्र आराध्य वृक्ष
 उंबर, औदुंबर   
नक्षत्र पर्यायी वृक्ष
 बेहडा 

राशी व्याप्ती  
 १ले चरण मेष राशीमध्ये,
 बाकीचे ३ चरण वृषभ राशीमध्ये  
नक्षत्र प्राणी
   बकरी  
नक्षत्र तत्व
  अग्नी
नक्षत्र स्वभाव
  क्रूर

पौराणिक मंत्र
कृतिका देवतामाग्निं मेशवाहनं संस्थितम् l
स्त्रुक् स्तुवाभीतिवरधृक्सप्तहस्तं नमाम्यहम् ll        
नक्षत्र देवता नाममंत्र
ॐ आग्नेय नमः l  
नक्षत्र पीडाहर मंत्र
 आग्नेयः पुरुषोरक्त सर्व देवमयोव्ययः ll    
नक्षत्र नाम मंत्र
ॐ कृतिकाभ्यो नमःl     
                 
                    रोहिणी
   नक्षत्र
 रोहिणी
नक्षत्र देवता
 ब्रम्हा  
नक्षत्र स्वामी
 चंद्र  
नक्षत्र आराध्य वृक्ष
 जांभळी, जांभूळ   
नक्षत्र पर्यायी वृक्ष
 बेल 
राशी व्याप्ती  
  ४ हि चरण वृषभ राशीमध्ये
नक्षत्र प्राणी
   सर्प  
नक्षत्र तत्व
  पृथ्वी  
नक्षत्र स्वभाव
  शुभ

पौराणिक मंत्र
प्रजापतीश्वतुर्बाहुः कमंडल्वक्षसूत्रधृत् l
वराभयकरः शुध्दौ रोहिणी देवतास्तु मे ll         

नक्षत्र देवता नाममंत्र
१)ॐ ब्रम्हणे नमःl
२)  ॐ प्रजापतये नमःll

नक्षत्र पीडाहर मंत्र
त्रुवाक्ष मालाकरक पुस्तकाढ़यं चतुर्भुजं l
सर्वारिष्ट विनाशाय दातवत्क्रं नमामिच ll       
नक्षत्र नाम मंत्र
ॐ रौहिण्यै नमःl  
  
                                   मृगशीर्ष
   नक्षत्र
 मृगशीर्ष
नक्षत्र देवता
 चंद्र
नक्षत्र स्वामी
मंगळ
नक्षत्र आराध्य वृक्ष
 खैर (कात)  
नक्षत्र पर्यायी वृक्ष
 पिंपळ 
राशी व्याप्ती  
२ चरण वृषभ राशीमध्ये,बाकीचे २ चरण मिथुन राशीमध्ये  
नक्षत्र प्राणी
   सर्प
नक्षत्र तत्व
  वायु
नक्षत्र स्वभाव
  शुभ

पौराणिक मंत्र
श्वेतवर्णाकृतीः सोमो व्दिभुजो वरदण्डभृत् l
दशाश्वरथमारूढो मृगशिर्षोस्तु मे मुदे ll          
नक्षत्र देवता नाममंत्र
१)  ॐ चंद्रमसे नमःl
२)  ॐ सोमाय नमःl     

नक्षत्र पीडाहर मंत्र
सर्व नक्षत्रं मध्येतु सोमोराजा व्यवस्थितः l
सर्वारिष्ट विनाशाय सोमाय सततं नमः ll     
नक्षत्र नाम मंत्र
ॐ मृगशीर्षाय नमःl  
                        
                  आर्द्रा        
   नक्षत्र
 आर्द्रा        

नक्षत्र देवता
 रुद्र (शिव)

नक्षत्र स्वामी
 राहु

नक्षत्र आराध्य वृक्ष
 कृष्णागरू  

नक्षत्र पर्यायी वृक्ष
 चंदन 

राशी व्याप्ती  
४ हि चरण मिथुन राशीमध्ये

नक्षत्र प्राणी
   कुत्रा  

नक्षत्र तत्व
  जल  

नक्षत्र स्वभाव
  तीक्ष्ण  


पौराणिक मंत्र
रुद्र श्वेतो वृशारूढः श्वेतमाल्यश्चतुर्भुजःl
शूलखड्गाभयवरान्दधानो मे प्रसीदतु ll           

नक्षत्र देवता नाममंत्र
ॐ रुद्राय नमः l     


नक्षत्र पीडाहर मंत्र
रुद्रोदेवो वृषारुढश्चतुर्बाहुस्त्रिलोचनःl
सर्वारिष्ट विनाशाय रुद्रायच नमोनमःll          

नक्षत्र नाम मंत्र
ॐ आर्द्रायै नमःl  

                           पुनर्वसु   
    नक्षत्र
 पुनर्वसु
नक्षत्र देवता
 अदिती  
नक्षत्र स्वामी
 गुरू  
नक्षत्र आराध्य वृक्ष
 वेळू / बांबू   
नक्षत्र पर्यायी वृक्ष
 वड 
राशी व्याप्ती  
3 चरणे मिथुन राशीमध्ये,बाकीचे १ चरण कर्क राशीमध्ये  
नक्षत्र प्राणी
  मांजर  
नक्षत्र तत्व
  वायु
नक्षत्र स्वभाव
  चर  

पौराणिक मंत्र
अदितीः पीतवर्णाश्च स्त्रुवाक्षकमण्डलून l
दधाना शुभदा मे स्यात पुनर्वसु कृतारव्या ll       
नक्षत्र देवता नाममंत्र
१)ॐ आदित्यै नमःl
२)ॐ आदितये नमःl     
नक्षत्र पीडाहर मंत्र
अदितीर्देवमाताच पुनर्वस्वधिपातया l
सर्वारिष्ट विनाशाय आदित्यैय नमोनमःll               
नक्षत्र नाम मंत्र
ॐ आर्द्रायै नमःl  

                               पुष्य
      नक्षत्र
 पुष्य
नक्षत्र देवता
 गुरु  
नक्षत्र स्वामी
 शनि
नक्षत्र आराध्य वृक्ष
 पिंपळ  
नक्षत्र पर्यायी वृक्ष
 पळस 
राशी व्याप्ती  
४ हि चरण कर्क राशीमध्ये
नक्षत्र प्राणी
 बकरी 
नक्षत्र तत्व
 अग्नी  
नक्षत्र स्वभाव
 शुभ

पौराणिक मंत्र
वंदे बृहस्पतिं पुष्यदेवता मानुशाकृतिम् l
सर्वाभरण संपन्नं देवमंत्रेण मादरात् ll        
नक्षत्र देवता नाममंत्र
ॐ बृहस्पतये नमःl  

नक्षत्र पीडाहर मंत्र
देवमंत्री विशालाक्ष सदालोकहिते रतःl
सर्वारिष्ट विनाशाय धिषणाय नमोनमःll           
नक्षत्र नाम मंत्र
ॐ पुष्याय नमःl  

                                 आश्लेषा                               
  नक्षत्र
 आश्लेषा
नक्षत्र देवता
 सर्प   
नक्षत्र स्वामी
 बुध
नक्षत्र आराध्य वृक्ष
 जुई (नागचाफा)
नक्षत्र पर्यायी वृक्ष
 उंडी 
राशी व्याप्ती  
४ हि चरण कर्क राशीमध्ये
नक्षत्र प्राणी
  मांजर 
नक्षत्र तत्व
  जल  
नक्षत्र स्वभाव
  तीक्ष्ण,शोक 
पौराणिक मंत्र
सर्पोरक्त स्त्रिनेत्रश्च फलकासिकरद्वयःl
आश्लेषा देवता पितांबरधृग्वरदो स्तुमे ll       
नक्षत्र देवता नाममंत्र
ॐ सर्पेभ्यो नमःl   

नक्षत्र पीडाहर मंत्र
स्वर्वेद्यावश्वीनौ देवौ व्दिभुजौ शुक्लवर्णको l
सर्वारिष्ट विनाशाय तुस्मै नित्यं नमोनमःll           
नक्षत्र नाम मंत्र
ॐ आश्लेषायै नमःl  
  
                      मघा
   नक्षत्र
मघा
नक्षत्र देवता
पितर
नक्षत्र स्वामी
केतु
नक्षत्र आराध्य वृक्ष
वड  
नक्षत्र पर्यायी वृक्ष
रिठा 
राशी व्याप्ती  
४ हि चरण सिंह राशीमध्ये
नक्षत्र प्राणी
उंदीर 
नक्षत्र तत्व
अग्नी  
नक्षत्र स्वभाव
क्रुर, उग्र 

पौराणिक मंत्र
पितरः पिण्डह्स्ताश्च कृशा धूम्रा पवित्रिणःl
कुशलं द्घुरस्माकं मघा नक्षत्र देवताःll        
नक्षत्र देवता नाममंत्र
ॐ पितृभ्यो नमःl      

नक्षत्र पीडाहर मंत्र
पितरः कृष्णवर्नाश्च चतुर्हस्ता विमा नगाःl
सर्वारिष्ट विनाशाय तेभ्यो नित्यं नमोनमः ll           
नक्षत्र नाम मंत्र
ॐ मघायै नमःl  
  
                 पुर्वा (फाल्गुनी) 
   नक्षत्र
 पुर्वा (फाल्गुनी) 
नक्षत्र देवता
 भग  
नक्षत्र स्वामी
 शुक्र
नक्षत्र आराध्य वृक्ष
 पलाश (पळस)
नक्षत्र पर्यायी वृक्ष
 बेल
राशी व्याप्ती  
४ हि चरण सिंह राशीमध्ये
नक्षत्र प्राणी
   उंदीर  
नक्षत्र तत्व
  क्रुर
नक्षत्र स्वभाव
  शुभ

पौराणिक मंत्र
भगं रथवरारुढं व्दिभुंज शंखचक्रकम् l
फाल्गुनीदेवतां ध्यायेत् भक्ताभीष्टवरप्रदाम् ll              
नक्षत्र देवता नाममंत्र
ॐ भगाय नमःl   

नक्षत्र पीडाहर मंत्र
स्वर्वेद्यावश्वीनौ देवौ व्दिभुजौ शुक्लवर्णको l
सर्वारिष्ट विनाशाय अश्विभ्यांवै नमो नमः         
नक्षत्र नाम मंत्र
ॐ पुर्व फाल्गुनीभ्यां नमःl  
  
                           उत्तरा (फाल्गुनी) 
     नक्षत्र
 उत्तरा (फाल्गुनी) 
नक्षत्र देवता
 अर्यमा  
नक्षत्र स्वामी
 रवि
नक्षत्र आराध्य वृक्ष
 पायरी ( पिंपरी ) प्लक्ष  
नक्षत्र पर्यायी वृक्ष
 अर्जुन
राशी व्याप्ती  
१ ले चरण सिंह राशीमध्ये,बाकीचे ३ चरण कन्या राशीमध्ये  
नक्षत्र प्राणी
 गाय  
नक्षत्र तत्व
  वायु
नक्षत्र स्वभाव
  शुभ

पौराणिक मंत्र
संपूजयाम्यर्यमणं फाल्गुनी तार देवताम् l
गायत्री मंत्रः धुम्रवर्णं रथारुढं सुशक्तिकरसंयुतम् ll            
नक्षत्र देवता नाममंत्र
 ॐ अर्यम्ने नमः

नक्षत्र पीडाहर मंत्र
उत्तराधिपतिश्चैव लोकसंरक्षकस्तथा l  
सर्वारिष्ट विनाशाय तस्मै नित्यं नमोनमःll           
नक्षत्र नाम मंत्र
ॐ उत्तरा फाल्गुनीभ्यां नमःl  
  
                        हस्त
    नक्षत्र                        
 हस्त
नक्षत्र देवता
 सुर्य
नक्षत्र स्वामी
 चंद्र
नक्षत्र आराध्य वृक्ष
 जाई,चमेली 
नक्षत्र पर्यायी वृक्ष
 रिठा 
राशी व्याप्ती  
४ हि चरण कन्या राशीमध्ये
नक्षत्र प्राणी
   म्हैस  
नक्षत्र तत्व
  वायु
नक्षत्र स्वभाव
  शुभ, सत्वगुणी  

पौराणिक मंत्र
सवितारहं वंदे सप्ताश्चरथ वाहनम् l 
पद्मासनस्थं छायेशं हस्तनक्षत्रदेवताम् ll            
नक्षत्र देवता नाममंत्र
ॐ सवित्रे नमःl

नक्षत्र पीडाहर मंत्र
हस्तस्याधिपतीः सुर्यःजगदात्मा तथैवच l
सर्वारिष्ट विनाशाय अश्विभ्यांवै नमो नमःll           
नक्षत्र नाम मंत्र
ॐ हस्ताय नमःl  
        
  
                         चित्रा
   नक्षत्र
 चित्रा
नक्षत्र देवता
 त्वष्टा  
नक्षत्र स्वामी
 मंगळ
नक्षत्र आराध्य वृक्ष
 बेल  
नक्षत्र पर्यायी वृक्ष
 बकुळ 
राशी व्याप्ती  
२ चरण कन्या राशीमध्ये,बाकीचे २ चरण तुळ राशीमध्ये  
नक्षत्र प्राणी
   वाघ  
नक्षत्र तत्व
  वायु
नक्षत्र स्वभाव
  तीक्ष्ण

पौराणिक मंत्र
त्वष्टारं रथमारूढं चित्रानक्षत्रदेवताम् l
शंखचक्रान्वितकरं किरीटीनमहं भजे ll            
नक्षत्र देवता नाममंत्र
ॐ त्वष्ट्रे नमःl

नक्षत्र पीडाहर मंत्र
त्वाष्ट्राॠक्षधिपश्चैव भक्त संरक्षकस्तथा l     
सर्वारिष्ट विनाशाय त्वष्ट्राधिप नमोनमःll           
नक्षत्र नाम मंत्र
ॐ चित्रायै नमःl  
  
                      स्वाती   
        नक्षत्र
स्वाती   
नक्षत्र देवता
 वायु  
नक्षत्र स्वामी
 राहु
नक्षत्र आराध्य वृक्ष
 अर्जुन  
नक्षत्र पर्यायी वृक्ष
 काटे सांवर 
राशी व्याप्ती  
४ हि चरण तुळ राशीमध्ये
नक्षत्र प्राणी
  म्हैस 
नक्षत्र तत्व
  अग्नी  
नक्षत्र स्वभाव
  शुभ

पौराणिक मंत्र
वायुवरं मृगारुढं स्वाती नक्षत्र देवताम् l
खड्.ग चर्मोज्वल करं धुम्रवर्ण नमाम्यह्म् ll          
नक्षत्र देवता नाममंत्र
ॐ वायवे नमः l     

नक्षत्र पीडाहर मंत्र
स्वर्वेद्यावश्वीनौ देवौ व्दिभुजौ शुक्लवर्णको l
सर्वारिष्ट विनाशाय अश्विभ्यांवै नमो नमः         
नक्षत्र नाम मंत्र
ॐ स्वात्यै नमःl  

                                                      विशाखा
          नक्षत्र
 विशाखा
नक्षत्र देवता
 इंद्राग्नी  
नक्षत्र स्वामी
 गुरू  
नक्षत्र आराध्य वृक्ष
 देव बाभुळ ( दा.पं. = नागकेशर )   
नक्षत्र पर्यायी वृक्ष
 पारिजातक 
राशी व्याप्ती  
पहिले ३ चरण तुळ राशीमध्ये,बाकीचे १ चरण वृश्चिक राशीमध्ये  
नक्षत्र प्राणी
 वाघ
नक्षत्र तत्व
 वायु
नक्षत्र स्वभाव
 अशुभ

पौराणिक मंत्र
इंद्राग्नीशुभदौ स्यातां विशाखा देवतेशुभे l
नमोम्ये करथारुढौ वराभयकरांबुजौ ll            
नक्षत्र देवता नाममंत्र
ॐ इंद्राग्नीभ्यां नमः   

नक्षत्र पीडाहर मंत्र
स्वर्वेद्यावश्वीनौ देवौ व्दिभुजौ शुक्लवर्णको l
सर्वारिष्ट विनाशाय इंद्राग्नीभ्यां नमोनमः ll           
नक्षत्र नाम मंत्र
ॐ विशाखाभ्यां नमःl  

                अनुराधा
       नक्षत्र
 अनुराधा
नक्षत्र देवता
 मित्र  
नक्षत्र स्वामी
 शनि
नक्षत्र आराध्य वृक्ष
 नागकेशर
नक्षत्र पर्यायी वृक्ष
 सिता अशोक 
राशी व्याप्ती  
४ हि चरण वृश्चिक राशीमध्ये
नक्षत्र प्राणी
 हरीण  
नक्षत्र तत्व
 पृथ्वी  
नक्षत्र स्वभाव
 शुभ

पौराणिक मंत्र
मित्रं पद्मासनारूढं अनुराधेश्वरं भजे l
शूलां कुशलसद्भाहुं युग्मंशोणितवर्णकम् ll           
नक्षत्र देवता नाममंत्र
ॐ मित्राय नमः l    

नक्षत्र पीडाहर मंत्र
अनुराधाधिपोमित्रः आयुष्योवर्धकस्तथा l  
सर्वारिष्ट विनाशाय मित्रायच नमोनमः         
नक्षत्र नाम मंत्र
ॐ अनुराधाभ्यो नमःl  
                                                  जेष्ठा
   नक्षत्र
जेष्ठा
नक्षत्र देवता
इंद्र
नक्षत्र स्वामी
बुध
नक्षत्र आराध्य वृक्ष
निर्गुडी/सांबळ ( दा.पं. = सांबर )
नक्षत्र पर्यायी वृक्ष
लोध्र
राशी व्याप्ती  
४ हि चरण वृश्चिक राशीमध्ये
नक्षत्र प्राणी
हरीण
नक्षत्र तत्व
पृथ्वी
नक्षत्र स्वभाव
तीक्ष्ण

पौराणिक मंत्र
श्वेतहस्तिनमारूढं वज्रांकुशलरत्करम् l
सहस्त्रनेत्रं पीताभं इंद्रं ह्रदि विभावये ll
नक्षत्र देवता नाममंत्र
ॐ इंद्राय नमःl

नक्षत्र पीडाहर मंत्र
इंद्रः सुरपतिः श्रेष्ठो वज्रहस्तो महाबलः l
रातयज्ञाधिपो देवस्तर मैनित्यं नमो नमः ll
नक्षत्र नाम मंत्र
ॐ जेष्ठायै नमःl
                                      मूळ
               नक्षत्र
मूळ
नक्षत्र देवता
निॠति ( राक्षस )
नक्षत्र स्वामी
केतु
नक्षत्र आराध्य वृक्ष
राळ
नक्षत्र पर्यायी वृक्ष
देव बाबुळ
राशी व्याप्ती  
४ हि चरण धनु राशीमध्ये
नक्षत्र प्राणी
कुत्रा
नक्षत्र तत्व
जल
नक्षत्र स्वभाव
तीक्ष्ण

पौराणिक मंत्र
खड्.गखेटधरं कृष्णं यातुधानं नृवाहनम् l
अर्ध्वकेशं विरुपाक्षं भजे मुलाधिदेवताम् ll
नक्षत्र देवता नाममंत्र
ॐ निॠतये नमः l

नक्षत्र पीडाहर मंत्र
निॠति खड्.गहस्तंच सर्व लोकैक पावन l
नरवाहन मत्युग्रं वंदेहं कालिकाप्रियं ll
नक्षत्र नाम मंत्र
ॐ मुलाय नमःl
            
                        पूर्वाषाढा
   नक्षत्र
पूर्वाषाढा
नक्षत्र देवता
जल / उदक
नक्षत्र स्वामी
शुक्र
नक्षत्र आराध्य वृक्ष
वेत
नक्षत्र पर्यायी वृक्ष
अशोक सीता
राशी व्याप्ती  
४ हि चरण धनु राशीमध्ये
नक्षत्र प्राणी
वानर
नक्षत्र तत्व
जल
नक्षत्र स्वभाव
उग्र

पौराणिक मंत्र
आषाढदेवता नित्यमापः सन्तु शुभावहाःl
समुद्र गास्तरा गिणोल्हादिन्यः सर्वदेहिनाम् ll
नक्षत्र देवता नाममंत्र
ॐ अद्भयो नमःl

नक्षत्र पीडाहर मंत्र
स्त्रीरूपाः पाशाकलशहस्ता मकरवाहनाःl
श्वेतमौक्तिक भूषाढ्या अद्भस्ताभ्यो नमो नमःll
नक्षत्र नाम मंत्र
ॐ पूर्वाषाढाभ्यां नमःl


                                          उत्तराषाढा
   नक्षत्र
उत्तराषाढा
नक्षत्र देवता
विश्वदेव
नक्षत्र स्वामी
रवि
नक्षत्र आराध्य वृक्ष
फणस
नक्षत्र पर्यायी वृक्ष
कांचन
राशी व्याप्ती  
पहिले चरण धनु राशीमध्ये,बाकीचे ३ चरण मकर राशीमध्ये
नक्षत्र प्राणी
मुंगुस
नक्षत्र तत्व
पृथ्वी
नक्षत्र स्वभाव
स्थिर

पौराणिक मंत्र
विश्वांदेवान् अहं वंदेषाढनक्षत्रदेवताम् l
श्रीपुष्टिकीर्तीधीदात्री सर्वपापानुमुक्तये ll
नक्षत्र देवता नाममंत्र
ॐ विश्वेभ्यो देवेभ्यो नमः l

नक्षत्र पीडाहर मंत्र
देवता बहुरूपत्वात् विश्वेदेवास्तथैवच l
सर्वारिष्ट विनाशाय तेभ्यो नित्यं नमो नमःll
नक्षत्र नाम मंत्र
ॐ उत्तराषाढाभ्यां नमःl
                           श्रवण
नक्षत्र
श्रवण
नक्षत्र देवता
विष्णु
नक्षत्र स्वामी
चंद्र
नक्षत्र आराध्य वृक्ष
रुई ( अर्क ) मंदार
नक्षत्र पर्यायी वृक्ष
आंबा
राशी व्याप्ती
४ हि चरण मकर राशीमध्ये
नक्षत्र प्राणी
वानर
नक्षत्र तत्व
पृथ्वी
नक्षत्र स्वभाव
चर

पौराणिक मंत्र
शांताकारं चतुर्हस्तं श्रोणा नक्षत्रवल्लभम् l
विष्णु कमलपत्राक्षं ध्यायेद् गरुड वाहन् ll
नक्षत्र देवता नाममंत्र
ॐ विष्णवे नमः l

नक्षत्र पीडाहर मंत्र
विष्णुं विष्णुं महाविष्णुं महेश्वरं l
सर्वारिष्ट विनाशाय नमामि पुरुषोत्तम ll
नक्षत्र नाम मंत्र
ॐ श्रवणाय नमःl
            धनिष्ठा
              नक्षत्र
धनिष्ठा
नक्षत्र देवता
वसु
नक्षत्र स्वामी
मंगळ
नक्षत्र आराध्य वृक्ष
शमी
नक्षत्र पर्यायी वृक्ष
नीम
राशी व्याप्ती  
पहिले २ चरण मकर राशीमध्ये,बाकीचे २ चरण कुंभ राशीमध्ये
नक्षत्र प्राणी
सिंह
नक्षत्र तत्व
पृथ्वी
नक्षत्र स्वभाव
थोडेसे शुभ

पौराणिक मंत्र
श्राविष्ठादेवतां वंदे वसुन्वरधराश्रिताम् l
शंखचक्रांकितरांकिरीटांकित मस्तकाम् ll
नक्षत्र देवता नाममंत्र
ॐ वसुभ्यो नमःl

नक्षत्र पीडाहर मंत्र
अष्टौदेवाच वसवो यज्ञ संरक्षकास्तथा l
सर्वारिष्ट विनाशाय तेभ्यो नित्यं नमो नमःll
नक्षत्र नाम मंत्र
ॐ धनिष्ठायै नमःl
                    शततारका               
   नक्षत्र
शततारका
नक्षत्र देवता
वरुण
नक्षत्र स्वामी
राहु
नक्षत्र आराध्य वृक्ष
कदंब
नक्षत्र पर्यायी वृक्ष
आपटा
राशी व्याप्ती  
४ हि चरण कुंभ राशीमध्ये
नक्षत्र प्राणी
घोडा
नक्षत्र तत्व
जल
नक्षत्र स्वभाव
चर

पौराणिक मंत्र
वरुणं सततं वंदे सुधाकलश धारीणम् l
पाशहस्तं शतभिशग् देवतां देववंदीतम ll
नक्षत्र देवता नाममंत्र
ॐ वरुणाय नमः

नक्षत्र पीडाहर मंत्र
पाशहस्तंच वरुणं यादसां पतिमीश्वरं l
अपांपति महं वंदे देवं मकरवाहनं ll
नक्षत्र नाम मंत्र
ॐ शतभिषजे नमःl
                        पुर्वाभाद्रपदा 
   नक्षत्र
पुर्वाभाद्रपदा
नक्षत्र देवता
अजैक चरण
नक्षत्र स्वामी
गुरू
नक्षत्र आराध्य वृक्ष
आंबा
नक्षत्र पर्यायी वृक्ष
हिरडा
राशी व्याप्ती  
पहिले ३ चरण कुंभ राशीमध्ये,बाकीचे १ चरण मीन राशीमध्ये
नक्षत्र प्राणी
सिंह
नक्षत्र तत्व
अग्नी
नक्षत्र स्वभाव
उग्र

पौराणिक मंत्र
शिरसा महजं वंदे ध्येकपादं तमोपहम् l
मुदे प्रोष्ठपदेवानं सर्वदेवनमस्कृतम् ll
नक्षत्र देवता नाममंत्र
ॐ अजैकपदे नमःl

नक्षत्र पीडाहर मंत्र
अजायैकपदे नित्यं लोकस्यानंददायकः l
सर्वारिष्ट विनाशाय तस्मै नित्यं नमो नमःll
नक्षत्र नाम मंत्र
ॐ पुर्वाप्रोष्ठपद्भ्यां नमःl
  
                      उत्तराभाद्रपदा 
   नक्षत्र
उत्तराभाद्रपदा
नक्षत्र देवता
अहिर्बुंधन्य
नक्षत्र स्वामी
शनि
नक्षत्र आराध्य वृक्ष
कडुलिंब ( नीम )
नक्षत्र पर्यायी वृक्ष
आवळा
राशी व्याप्ती  
४ ही चरण मीन राशीमध्ये
नक्षत्र प्राणी
गायक
नक्षत्र तत्व
जल
नक्षत्र स्वभाव
ध्रुव

पौराणिक मंत्र
अहिर्मे बुध्नियो भूयात मुदे प्रोष्ठ पदेश्वरःl
शंखचक्रांकीतकरः किरीटोज्वलमौलिमान् ll
नक्षत्र देवता नाममंत्र
ॐ अहिर्बुंधन्याय नमःl

नक्षत्र पीडाहर मंत्र
अहिर्बुंधन्यः सदाश्रेष्ठः सर्वरक्षणकस्तथा l   
 सर्वारिष्ट विनाशाय तस्मै नित्यं नमो नमःll
नक्षत्र नाम मंत्र
ॐ उत्तरप्रोष्ठपदभ्यां नमःl

                                                                                   रेवती
   नक्षत्र
रेवती
नक्षत्र देवता
पूषा
नक्षत्र स्वामी
बुध
नक्षत्र आराध्य वृक्ष
मोह ( मधुक )
नक्षत्र पर्यायी वृक्ष
जेष्ठमध / चिंच
राशी व्याप्ती  
४ ही चरण मीन राशीमध्ये
नक्षत्र प्राणी
हत्ती
नक्षत्र तत्व
जल
नक्षत्र स्वभाव
मृदु

पौराणिक मंत्र
पूषणं सततं वंदे रेवतीशं समृध्दये l
वराभयोज्वलकरं रत्नसिंहासने स्थितम् ll
नक्षत्र देवता नाममंत्र
ॐ पूष्णे नमःl

नक्षत्र पीडाहर मंत्र
         अधिपोरेवतीॠक्षः पशुरक्षणकस्तथा l         
 सर्वारिष्ट विनाशाय तस्मै नित्यं नमो नमःll
नक्षत्र नाम मंत्र
ॐ रेवत्यै नमःl