Pages

Thursday, February 27, 2014

ज्योतिषीय व वास्तुशास्त्रीय उपाय


                                   ज्योतिषीय व वास्तुशास्त्रीय उपाय
१. घरातील देवघर हे नेहमी ईशान्य ( पुर्व आणि उत्तर मधील दिशा ) दिशेलाच असावे व नित्य पुजा केल्याने घराची सर्वांगीण प्रगती होते.
२.आपल्याला ज्यांच्यामुळे अन्न, वस्त्र, निवारा आणि हे आयुष्य मिळाले आहे त्यांचे दररोज आभार मानावेत. ( आई वडील, कुलदेवता व देव देवता, असंख्य व्यक्ती ज्यांचा तुमच्या आयुष्याशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संबंध येतो )
३. आई वडिलांचा नेहमी आदर सन्मान करा, नशीब निश्चित साथ देते, वृध्द आई वडील श्री लक्ष्मी विष्णु प्रमाणे असतात.
४. रोख रक्कम हातात पडली की ती घरी आणून देवापुढे ठेवावी. कुठल्याही परिस्थितीत त्यातील एक रुपयाही खर्च करु नये दुसऱ्या दिवसापासुन खर्च करायला सुरुवात करावी.
५. व्यापाऱ्यांनी वापरावयाच्या पैशांचा पाऊच किंवा पिशवी शक्यतो हिरव्या रंगाची वापरावी
६. बुधवारी पैसे कोणास उधार देऊ नयेत. दिल्यास ते बुडतात व वसुलीला त्रास होतो. गुरुवारी पैसे देणे चांगलेमंगळवारी कर्जाचे पैसे देऊन कर्जफेड करावी. वा शुक्रवारी कर्जफेड स्थितीत सुधारणा होते. मंगळवारी पैसे/कर्ज घेतल्यास ते लवकर फिटत नाहीत.
७. संध्याकाळनंतर दिवे लागल्यावर कोणाला पैसे देऊ नये. तसेच दैनंदिन राहु काळात पैसे देणे/घेणे व्यवहार करू नये.
८. दिवा वा समईच्या ज्योतीचे तोंड उत्त्तरेकडे असल्यास लक्ष्मी प्रसन्न होते. पुर्वेकडे असल्यास सुखप्राती होते.
९. आपल्या कपाळी मधल्या बोटाने गंध लावुनच नंतर देवपुजा करावी. म्हणजे ती पुजा पुर्ण होते.
१०. कोणत्याही कामासाठी बाहेर निघताना नेहमी पुर्णांगाचा (ज्या नाकपुडीतुन श्वास सुरु आहे ती बाजु) पाय घराबाहेर टाकुन निघावे म्हणजे यश मिळते.
११. घरात मनीप्लँट लावु नये. पैशाची चणचण भासते.
१२. श्री स्वामी समर्थ ’ किंवा “ ॐ श्रीं नमः ” हा जप सतत धनलाभ होतो.
१३. लक्ष्मीप्राप्तीचा सोपा आणि अनुभवसिध्द उपाय म्हणजे पिठात थोडी साखर मिसळुन ते पीठ मुंग्यांना खाऊ घालावे.
१४.घरातुन कामानिमित्त्त बाहेर पडताना शर्टाच्या खिशात थोडेतरी पैसे ठेवावेतच. मोकळ्या खिशाने कधीही घराबाहेर पडु नये. पैसा पैशाकडेच जातो हे सत्य आहे.
१५. घराच्या व दुकानाच्या दरवाजाला पायांनी स्पर्श करू नये.
१६. रोज सकाळी पुजा झाल्यावर घरात शंख न विसरता फुंकावा. घरात वास्तव्यास असलेली अलक्ष्मी (लक्ष्मीची मोठी बहीण अवदसा) काढता पाय घेईल आणि लक्ष्मी चिरंतर नांदेल.
१७. द्रव्यप्राप्तीसाठी काही प्रभावी मंत्राचा विनियोगही सांगितला आहे. द्रव्यप्राप्ती करून देणारा सर्वात प्रभावी मंत्र म्हणजे “ॐ नमो विष्णवे नम:” जेथे भगवान विष्णु तेथे माता श्री लक्ष्मी असणारच. ( उत्तरेकडे तोंड करून बोलल्यास उत्तमच )
 १८. जो मळकट कपडे घालतो. दात स्वच्छ घासत नाहीजास्त जेवतोकठोर बोलतो आणि सुर्योदयी अथवा सुर्यास्ता समयी झोपतो तो साक्षात श्री विष्णुदेव असला तरी माता श्री लक्ष्मी त्याला सोडुन निघुन जाते.
१९. जी व्यक्ती दररोज  सुर्याची बारा नावे घेवुन सुर्याला नमस्कार करते त्याला आयुष्यआरोग्यऎश्वर्य व तेजाची प्राप्ति होते.  ( १) ॐ सुर्याय नम: २) ॐ भास्कराय नम: ३) ॐ रवये नम : ४) ॐ मित्राय नम: ५) ॐ खगाय नम: ६) ॐ भानवे नम: ७) ॐ पुष्णे नम: ८) ॐ मरीचये नम: ९) ॐ आदित्याय नम: १०) ॐ सवित्रे नम: ११) ॐ अर्काय नम: १२) ॐ हिरण्यगर्भाय नम: )
२०. कोणाकडे आपले महत्वाचे काम असल्यास खिशातुन पाच लवंगा किंवा लसणीच्या सोललेल्या पाकळ्या एका पुडीत बांधुन घेऊन जाव्यात. यामुळे महत्वाच्या कामातील अडथळे नष्ट होऊन आपले काम होते. चांगला लाभ होतो.
२१. दर गुरुवारी तुळशीला थोडे कच्चे दुध घातल्याने घरात लक्ष्मीचे कायमस्वरूपी वास्तव्य राह्ते.
२२. “ ॐ यक्षाय कुबेराय वैश्रवणायधनधान्यधिपतये धनधान्य समृद्धी मे देही दापय स्वाहा ” उत्तर दिशेला कुबेराचा फोटो लावावा. हा कुबेराचा अत्यंत प्रभावी मंत्र आहे. या मंत्राचा १०८ वेळा कमळगट्टेच्या माळेवर जप करावा. श्री कुबेरांचा नित्य जप हा श्री लक्ष्मी प्रमाणे अतिशय महत्वाचा आहे
२३. कामानिमित्त घरातुन बाहेर पडताना एखादे तुळशीपत्र तोंडात टाकावे, पैशाअभावी अडकलेली कामे मार्गी लागतील.
२४. घरातील फरशी पुसताना थोडे खडे मिठ पाण्यात टाकावे. त्यायोगे घरातील नाकारात्मक ऊर्जा नष्ट होईल. लक्ष्मीप्राप्तीतले सर्व अडथळे दुर होतील.
२५. ज्या ज्या वेळी आपण समुद्रकिनारी फिरायला जाता त्या त्या वेळी जलदेवतेला प्रार्थना करून एक श्रीफळ ( नारळ ) कुंकू अर्पण करुन विसर्जित करा. बऱ्याच गोष्टी सत्मार्गी लागतात.
२६. दर शनिवारी संध्याकाळी मातीच्या दिव्यात सरसोच्या तेलाचा दिवा लावुन आणि गुळ मिश्रित पाणी सुर्यास्तानंतर पिंपळाला सात प्रदिक्षणा घालुन “ ॐ श्री अश्वत्थाय शरणं मम ” म्हणत अर्पण करावे व नंतर श्री शनिदेवांचा “ नीलांजन समाभासं रविपुत्रं यमाग्रजम, छाया मार्तंड संभुतं तं नमामि शनैश्वरम ” हा मंत्र ८ वेळा म्हणावा, हा श्री शनि पीडा कमी होण्याचा प्रभावी मंत्र आहे. 
२७. घरामध्ये सुर्यास्ताच्या अगोदर झाडु मारावा. सुर्यास्ताच्या झाडु मारल्यास माता श्री लक्ष्मी हि रुष्ठ होऊन घरातुन निघुन जाते व त्यामुळे घरामध्ये अलक्ष्मीचा वास राहतो.
२८.जो कोणी दररोज तुळस, पिंपळ आणि नक्षत्र आराध्य वृक्षाला पाणी घालतो त्याला सर्व गोष्टीत भरपुर यशाचा वरदहस्त प्राप्त होतो.
२९. कुलदैवताचे वर्षातुन एकदा दर्शन,अभिषेक व पुजा टाळाटाळ न करता करावी. तुमच्याकडे पैशाचा ओघ आणि यश सतत वाहत राहील.
३०. गुरूपुष्यामृत योगावर सराफाकडून किमान १ मिलीग्रॅम तरी सोने न विसरता प्रसंगी पोटाला चिमटे घेऊन विकत आणावे. पुरेसे सोने जमा झाले की पत्‍नीलाच एखादा दागिना करावा. सोने गुरुपुष्यामृत योगावर खरेदी करण्याचे कारण असे की ते विकायची पाळी कधीच येणार नाही.
३१. श्री विष्णु देवता, माता श्री लक्ष्मी, श्री कुबेरजी यांची साधनापुजाप्रार्थना करताना साधकाचे तोंड उत्तरेकडे असावे अथवा पुर्वेकडे.  
३२. कोणत्याही महत्त्वाच्या कामासाठी घराबाहेर पडताना चमचाभर गोड दही खाणे अत्यंत शुभ असते.
३३. स्नान करूनच भोजन करावे. जेवण केलेल्या ताटात हात धुऊ नये. मांडीवर वा हातात ताट घेऊन जेवु नये. दक्षिणेकडे तोंड करून जेवु नये.
३४. एक लांबलचक मोरपीस विकत आणुन ते घराच्या दक्षिणेकडील भिंतीवर सेलो टेपने चिकटवुन ठेवावे रोज सायंकाळी त्याला उदबत्ती ओवाळावी. हा तोडगा ज्यांचे येणे अडकुन पडले आहे त्यांनी अवश्य करून पाहण्यासारखा आहे.
३५. व्यापार मंदावत चालला असेलव्यापार बंद पडला असेल किंवा भांडवल असुनही व्यापार होत नसेल तर अशा वेळी व्यापारामध्ये यश येण्यासाठी पुढील प्रभावी तोडगा अवश्य करावा. दररोज सकाळी देवासमोर बसुन विष्णुसहस्त्रनामाचा जप करावा. ‘ॐ नमो विष्णवे नम:’ या मंत्राचा १०८ वेळा जप करावा. या तोडग्यामुळे लक्ष्मी प्रसन्न होऊन व्यापारामध्ये यश येते.
३६. रोज गरम तव्यावर पोळी-भाकरी भाजण्यापुर्वी दुध शिंपडावे यामुळे घरातील आजारपण कमी होते.
३७. जास्तीत जास्त अन्नदानाच्या योगे अनेक दोष नष्ट होतात.
३८. जेव्हा बँकेत पैसे जमा करण्यासाठी जात असाल तेव्हा रस्त्याने मनातल्या मनात “श्रीं श्रीं” मंत्राचा जप अवश्य करत जावा. यामुळे आर्थिक स्थितीमध्ये आश्र्चर्यकारक रूपात वृद्धी होईल. वारंवार धन जमा करण्याची संधी येईल व शक्यतो उत्तरेकडे तोंड करून बँकेचे व्यवहार करावेत.
३९. लक्ष्मीप्राप्तीसाठी अन्न व दुध झाकुन ठेवावे.
४०. घरातील नवीन केरसुणी आणल्यावर तिला हळद/कुंकू लावुन पुजा करून वापरावी. तिला पाय लावु नये व ती सहज दिसेल अशी ठेवु नये. दिवे लागल्यावर झाडु मारू नये.
४१. घराचा मुख्य दरवाजा नेहमी फडक्याने पुसुन स्वच्छ ठेवावा तसेच संध्याकाळी तिन्हीसांजेला मुख्य दरवाजा थोडा वेळ उघडा ठेवावा. त्या वेळेस धुप दाखवावा. लक्ष्मी प्रसन्न राहते.
४२. दसऱ्याच्या दिवशी एखाद्या गर्भश्रीमंत व चरित्र्यवान व्यक्तीने दिलेली आपट्याची पाने चांदीच्या अगर पितळेच्या डबीत ठेवुन ती देवापाशी ठेवावी. अशा तऱ्हेने मिळालेली आपटयाची पाने ही धन देणारी असतात.
४३. घरात ज्या खोलीत तिजोरी ठेवलेली असेल त्या भिंतीचा रंग काळालाल अथवा निळा नको. पिवळा असावा.
४४. रोज सकाळी पाण्यात थोडेसे खडे मीठ मिसळुन त्या पाण्याने घरातील फरशी पुसावी. मन:शांती लाभते .
४५. रोज सकाळी पहिली भाकरी गायीलादुसरी कुत्र्याला व तिसरी छतावर पक्ष्यांसाठी ठेवावी. यामुळे पितृदोष नाहीसा होतो व पितृदोषाने होणारा त्रासही कमी होतो.
४६. कोणाकडुन कर्ज घेतले तरत्यातला पहिला हफ्ता त्वरित कर्जफेड म्हणुन परत करावेत. कर्ज लवकर उतरते.
४७. माता श्रीलक्ष्मी साधना:- पौर्णिमेच्या रात्री आंघोळ करून रात्री १२-१८ वाजता चंद्राकडे पाहुन गायत्री मंत्र १२ वेळा म्हणून कोणाशीही न बोलता झोपी जावे. जर बोलण्याचा प्रसंग आला तर बोलल्यानंतर पुन्हा हातपाय धुऊन पुन्हा चंद्रबिंबाकडे पाहून गायत्री मंत्र १२ वेळा जपावा. गायत्री मंत्र: “ ॐ भुर्भव:स्व: तत्स वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धिमही धियोयोन: प्रचोदयात ” हा अतिशय प्रभावी उपाय आहे.
४८. सकाळी उठल्यावर अंथरुणातच करदर्शन ( दोन्ही हातांच्या तळव्याकडे बघुन )
 “ कराग्रे वसती लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमुले तु गोविंद प्रभाते करदर्शनम व नंतर भुमीला हात लावुन  “ समुद्रवसने देवी पर्वतस्तनमंडीते विष्णुपत्नि नमस्तुभ्यं पादस्पर्श क्षमस्वमे म्हणुन भुमिवंदन करावे.
४९. घराच्या प्रवेशद्वारावर/ मुख्य दरवाजावर लाल रंगाचे कुंकवाचे स्वस्तिक व शुभ लाभ चिन्ह काढावे. या स्वस्तिक व शुभ लाभची स्टिकर्स शक्यतो लावु नये.
५०. उंबरठयावर दर पोर्णिमेला तसेच अमावस्येला पाच कापराच्या वडया ( पंचमहाभुतांच्या दोष परिहारार्थ ) जाळाव्यात.
५१. तुटलेले अथवा भेगा गेलेले कपस्टीलचीकाचेची अथवा प्लॅस्टिकची भांडीबंद पडलेली घडयाळे किंवा भंगारवजा सामान घरात ठेवु नये. अशा वस्तु ताबडतोब घराबाहेर काढाव्यात कारण या तुटलेल्या व भंगारवजा वस्तुंमध्ये कलीचा वास असतो. अलक्ष्मीला आमंत्रण असते.
५२. एकाक्ष नारळाला विशेष महत्व का असते ?
    उत्तर:  बहुतेक सर्व नारळाला तीन डोळे असतात. क्वचितच एक डोळा असलेला नारळ असु शकतो. एकाक्ष नारळ लक्ष्मीदायक असल्याने सांपत्तिक लाभ होतो. म्हणुन अशा एकाक्ष नारळाला ‘चिंतामणी’ नारळ म्हणतात. असा नारळ फोडत नाहीत त्यास देवघरात किंवा वरती टांगुन व्यवस्थित ठेवावा.
५३. श्री विष्णुश्री सुर्य आणि श्री शिव यांच्या मंदिरासमोर कधीही घर बांधु नये.
५४. मंगळवार व रविवार हे दोन वार घर बांधण्याचा प्रारंभ करण्याच्या दृष्टिकोनातुन व वास्तुशांती साठी पुर्णत: वर्ज्य करावेत.
५५. घराच्या मुख्य दरवाजापेक्षा घराचे आतील दरवाजे हे कधीही उंच अथवा मोठे असु नयेत. घराच्या मुख्य दरवाज्याची चौकट नेहमी लाकडाचीच असावी.
५६. आपण नवीन आणि जुने लाकुड एकत्र करून कपात, फर्निचर, दरवाजा बनविला तर ते घरासाठी कलहकारक आणि अधोगतीकारक ठरतात.
५७. कोणत्याही आजारी माणसाने अथवा आजारी माणसास उत्तरेस तोंड करुन बसवुन औषध दिल्यास त्याचा आजार कमी होतो
५८. काटेरी रोपटी अथवा कॅक्ट्स घरात लावल्यामुळे त्या घरात राहणाऱ्या व्यक्तींना कसल्यातरी प्रकारची उद्विग्नता येत असते अथवा बारीक सारीक कारणावरून कुटुंबीयांमध्ये वादंग निर्माण होत असतात आणि म्हणुन अशा प्रकारचे काटेरी वृक्ष घरामध्ये लावणे प्रत्येकाने जरूर टाळावे.
५९. घडयाळ कोणत्या भिंतीवर लावणे योग्य ?
   उत्तर: घडयाळ ही एक जिवंतपणा दाखविणारी वस्तु मानत असल्याने पुर्व किंवा उत्तर भिंतीवर ते लावावे. बंद घडयाळे त्वरित दुरूस्त करावीत किंवा बदलावीत.
६०. बाधित वास्तुसाठी काय उपाय करता येतात?
   उत्तर: घरात सतत “ श्री स्वामी समर्थ ” चा जप चालु ठेवावा. श्री सप्तशतीची आवश्यकतेनुसार हवनात्मक नवचंडी किंवा शतचंडी करावी.
६१. एका मोठया संगमरवरी कुंडात उत्तरेस कमळाचे रोप लावावे. त्यामुळे व्यावसायिक ध्येयाप्रत तुमची त्या कमलासमान फुलुन वाटचाल होईल.
६२. दरवाजाच्या डोक्यावर खोबणीत मंगल कलश ठेवल्यास उत्तम आणि ते शक्य नसेल तर बाजारात मंगल कलशाची टाइल मिळते ती बसवावी.
६३. ज्या व्यक्तींच्या घरात बेलाचे रोपटे/झाड असते त्या घरात लक्ष्मीचा वास असतो.
६४. आपल्या घरच्या प्रवेशद्वारासमोर कोणतेही झाड असु नये हे शतश: खरे आहे. त्यामुळे द्वारवेध हा दोष निर्माण होतो. तसेच मुख्य प्रवेशद्वारावर कोणत्याही झाडाची सावली (सोने देणारे झाड असले तरी त्याची सावली प्रवेशद्वारावर असु नये) किंवा मंदिराच्या कळसाची सावली पडु नये नाहीतर नाश होऊ शकतो.
६५. घरमालकीण गरोदर असताना बांधकाम सुरू करू नये.
६६. ज्यांचा विवाह होण्यास अनेक अडचणी येतातठरलेले विवाह मोडतात अशांनी ‘नवनाथ भक्तिसार’ २८ वा अध्याय दररोज संध्याकाळी सातनंतर वाचावा.
 ६७. नोकरीधंद्यासाठी किंवा कोणत्याही कामासाठी घरातुन बाहेर पडण्यापुर्वी खालील मंत्र मनातल्या मनात ८ वेळा म्हणुन मगच घराचा उंबरा ओलांडावा
  ॐ कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेश नाशाय गोविंदाय नमो नम: 
६८. दररोज किंवा कोणतेही मुख्य किंवा महत्वाचे काम करताना कुलदेवताचे स्मरण जरूर करावे.
६९. पैसे मोजताना पैशाला कधीही थुंकी लावुन पैसे मोजु नयेत, पैसे मोजताना श्री विष्णु, श्री बालाजी, श्री लक्ष्मी आणि श्री कुबेरांचे स्मरण जरूर करावे.
७०. नोकरीच्या मुलाखतीस जाताना थोडा गुळ रस्त्यावरील गायीस खायला द्यावा.
९९. मुले नीट वागण्यासाठी नवनाथ भक्तिसारातील ५ वा अध्याय घरात दररोज संध्याकाळी ७ नंतर वाचावा.
१००. आपल्या घरामध्ये आपली पत्नीमुले किंवा कोणालाही अपशब्द वापरू नयेत. कारण वास्तु नेहमी तथास्तु म्हणत असते.
१०१. घरात रोज अग्निहोत्र चालत असेल तर उत्तम असते. अन्यथा निदान आठवडयातुन किंवा महिन्यातुन एकदा तरी करावे.
१०२. वर्षातुन एकदा तरी घरात उदकशांती किंवा पुजा श्रावणात करावी.
१०३. घरात नंदादीप सतत तेवत ठेवल्याने अशुभ ऊर्जा घरात राहत नाहीत, ज्या घरात अग्नि तेवत असतो तिकडे माता श्री लक्ष्मीचा वास असतो.
१०४. रोज सकाळ-संध्याकाळ आपणास आवडत्या अशा मंद सुवासाची उदबत्ती किंवा धुप घरात जाळावे.
१०५. लहान मुलांकडुन काही नित्य स्तोत्र रोज म्हणुन घ्यावीत व आपणही म्हणावीत, घरातील वातावरणात शुद्धी होते.
१०६. घरात कोणत्याही प्रकारची अडगळ ठेवु नका. शक्य तेवढी लवकर त्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावत जा. अडगळ म्हणजे अलक्ष्मी.
१०७. आपल्या स्वत:च्या गाडीचे पार्किंग उत्तरेस किंवा पुर्वेस तोंड करुन ठेवावे. दक्षिणेला तोंड करुन गाडी ठेवु नये.
१०८. शिकार केलेल्या प्राण्यांचे मुखवटे किंवा जंगली ओबडधोबड लाकडाचे सिरॅमिक्स किंवा मनाला विचलित करणाऱ्या गोष्टी घरात ठेवु नयेत.
१०९. बेडरुमला रंग लावताना पिस्ता किंवा गुलाबी रंगाचा वापर करावा. कारण हे रंग प्रेमाचे आणि समाधानाचे प्रतीक मानले जातात.
११०. दर बुधवारी तिजोरीची पुजा करावी. तिजोरीवर काही जड वस्तु किंवा देव वगैरे ठेवु नयेत.
१११. तुळशीत काही लोक शंकराची पिंड ठेवतात. ते चुकीचे आहे. तर काही लोक भंगलेल्या मुर्ती तुळशीत ठेवतात तेही चुकीचे आहे. तुळशीत फक्त देवास वापरलेले पाणी विसर्जित करावे. ( पिंडीस वाहिलेले पाणी सोडुन )
११२. घरात विनाकारण कटकट होत असेल तर घरामध्ये हळद आणि गोमुत्र मिश्रित पाणी शिंपडावे. तरीही फरक न वाटल्यास पाच सवाष्णींना मानपान करावे व दुध द्यावे, असे केल्याने कटकटी कमी होतील.
११३. दिवसभरांत सतत जास्तीत जास्त वेळा हरि ”  “हरि  म्हणत राहिल्यास बी. पी कमी होतो. हरि  म्हणताना ते ऎकण्याचा प्रयत्न करावा. जास्त फायदा होतो.
११४. श्रीवेद व्याससुध्दा म्हणतात ज्याचे मन किंवा विचार मोठे त्याचे भाग्यही मोठे असा मानसशास्त्राचा प्रत्यक्षानुक्षणी सिद्धान्त आहे म्हणुन नेहमी सकारात्मक विचार करावेत.
११५. अभ्यास खोलीत टेबलासमोर गणपतीसरस्वती किंवा इष्ट देवतेंची चित्रे ठेवावी.
११६. झोप येत नाही हा मंत्र बोला (२१ वेळा)                                                                                        “ या देवी सर्वभूतेषु निद्रारुपेण संस्थिता । नमस्तस्ये नमस्तस्ये नमस्तस्ये नमो नम: ”
११७. दरवाजे जिर्ण झाल्यास त्वरीत बदलणेएखाद्या दरवाजा जिर्ण होऊन कीड लागल्यास त्यामुळे दिशानुरूप घरातील व्यक्तीवर पुर्व ईशान्य पुरुषउत्तर ईशान्य स्त्रीदक्षिण नैॠत्य स्त्रीपश्चिम नैॠत्य पुरुषपश्चिम वायव्य स्त्रीपुर्व आग्नेय स्त्री अशा प्रकारे त्यांचे आरोग्य बिघडविण्यास कारणीभुत ठरतात
११८. ज्या वनस्पतीमधून पांढरा चिक येतो अशी झाडे घराभोवती लावु नये.
११९. “श्रीयंत्र” घरात स्थापण करून ‘श्रीसुक्त’ चा किमान एक पाठ रोज करावा.
१२०. वास्तुमध्ये किंवा पुजेमध्ये कोणत्याही प्रकारची अंत्यविधीची रक्षा ठेवु नये.
१२१. देवघरातदेवाच्या फोटोबरोबर मृत व्यक्तीचे फोटो ठेवु नये.
१२२. “ कराग्रे वसते लक्ष्मी: करमध्ये सरस्वती । करमुले तु गोविन्द: प्रभाते करदर्शनम ”
अर्थ : हाताच्या टोकावर (बोटांवर) लक्ष्मी असतेहाताच्या मुळाशी (मनगटालगत) सरस्वती असतेतळहाताच्या मध्यावर श्रीगोविन्द असतो. म्हणुन सकाळी तळव्यांचे दर्शन घ्यावे.
१२३. मुख्य दरवाज्यास लाकडाचा उंबरठा असणे आवश्यक असते.
१२४. एक स्वच्छ मोठी बाटली घेऊन त्या बाटलीत शुध्द पाणी भरावे. त्यात गोमुत्रकापुरहिंग पावडरवावडिंग पावडर सर्व मिळुन मोठे दोन चमचे टाकावेत. हे बाटलीतील पाणी संडास-बाथरूम सोडुन सर्व घरात सकाळ-संध्याकाळ शिंपडावे हा प्रयोग ४५ दिवस करावा.
१२५. ज्या नवीन वास्तुस दारेखिडक्या बसविलेल्या नाहीत अशा वास्तु मध्ये ब्राह्मणभोजन झाल्याशिवाय कधीही प्रवेश करू नये. कारण अशामुळे निरनिराळ्या आपत्तींना तोंड देण्याचा प्रसंग उद्‍भवतो. यमघंट योगावर गृहप्रवेश कधीही करू नये.
१२६. वास्तुमध्ये महारुद्रलघुरुद्र पुजन करावे.
१२७ उंबरठयावर लक्ष्मीची पावलं चिकटवु नयेत. कारण त्या माता श्री लक्ष्मीच्या पावलांवर आपली पावले पडणं हे काही बरं नाही.
१२८. आपल्या नावाची पाटी सेप्टी डोअर किंवा भिंतीवर न लावता मुख्य दरवाजावरच लावावी.
१२९. आपल्या नवीन घराला जुना दरवाजा बसवु नये (सेकंड हॅंड) असा दरवाजा आपण बसविला तर तो जुन्या स्वामीची इच्छा करतो. आणि सर्वच वास्तुरचनाकारांनी अशा दरवाजाला जोरदार विरोध केलला आहे.
१३०. रोज सकाळी उंबरठा स्वच्छ करावा. त्याची हळद कुंकू वाहुन पुजा करावी.



No comments:

Post a Comment